Posts

Showing posts from 2013

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नेता

Image
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा नेता, लढाऊ आणि बाणेदार वक्तव्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देणारा, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नेता म्हणूनच अण्णासाहेब जावळे-पाटील यांची महार ाष्ट्राला ओळख राहिली.  अण्णासाहेब जावळे-पाटील यांचे मूळ गाव मेंढा (जि. उस्मानाबाद) होते. त्यांचे वडील सिद्राम जावळे-पाटील हे सुरवातीला तुंगी (ता. औसा) आणि तेथून लातूरला स्थायिक झाले. वडील शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी काही वर्षे शेतकरी संघटनेचे कार्य केले होते. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब जावळे विद्यार्थीदशेपासूनच आक्रमक होते. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल्याने समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून ते विविध समस्यांविरुद्ध चळवळी करू लागले. त्यांनी मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन स्थापन केले. उत्कृष्ट भाषणशैली, निर्णयक्षमता आणि मागचा-पुढचा विचार न करता लढा देण्याची धमक पाहून मराठवाडा आणि महराष्ट्रभर त्यांचा लौकिक वाढला. समाजाचा प्रश्‍न तळमळीने मांडत गेल्याने ते फार कमी कालावधीत राज्यभरातील युवकांचे नेते बनले. त

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील

अण्णा साहेब जावळे अण्णा साहेब जावळे हे एक अजब रसायन होते.आश्रम शाळेत शिकणारा, अत्यंत गरीब कुटुंबात वाढणारा व्यक्ती एका मजबूत संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पदापर्यंत मजल मारू शकतो यावर विश्वास बसत नाही. आजपर्यंत एवढ्या संघटना झाल्या, सर्व समाजाच्या झाल्या. परंतु राजकीय लोकांवर सडेतोड टीका फक्त आणि फक्त अण्णा साहेबांनी केली. खेडेगावात एखाद्या मराठ्यावर प्रस्थापित व्यक्तीने अन्याय केल्यास त्याला झटपट  न्याय देण्याचे कार्य अण्णांनी केले.बऱ्याच मराठ्यांवर atrocity च्या खोट्या केसेस टाकलेल्या होत्या. त्यांच्या मागेही अण्णा खंबीरपणे उभा राहिले. मला आठवते मी २००३ ला औरंगाबादेत आल्यावर एका गावात ४ मराठ्यांवर हल्ला झाला होता. हल्ला करणारे प्रचंड श्रीमंत आणि भक्कम राजकीय आश्रय बाळगणारे होते. त्यामुळे प्रशासनाकडून न्याय मिळण्यास विलंब होणारच. परंतु अण्णाच्या छाव्यांनी त्या मुजोर आणि माजोर धेंडाला तत्काळ वठणीवर आणले. त्या व्यक्तीने छावाची एवढी दहशत घेतली की काही दिवस तो फरार झाला होता. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठ्यांच्या नादाला लागू नका अशी डरकाळी अण्णांनी फोडली होती. अन्नाची तऱ्हाही वेगळीच.

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील

Image

POEMS

Image