मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील

अण्णा साहेब जावळे

अण्णा साहेब जावळे हे एक अजब रसायन होते.आश्रम शाळेत शिकणारा, अत्यंत गरीब कुटुंबात वाढणारा व्यक्ती एका मजबूत संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पदापर्यंत मजल मारू शकतो यावर विश्वास बसत नाही. आजपर्यंत एवढ्या संघटना झाल्या, सर्व समाजाच्या झाल्या. परंतु राजकीय लोकांवर सडेतोड टीका फक्त आणि फक्त अण्णा साहेबांनी केली. खेडेगावात एखाद्या मराठ्यावर प्रस्थापित व्यक्तीने अन्याय केल्यास त्याला झटपट न्याय देण्याचे कार्य अण्णांनी केले.बऱ्याच मराठ्यांवर atrocity च्या खोट्या केसेस टाकलेल्या होत्या. त्यांच्या मागेही अण्णा खंबीरपणे उभा राहिले. मला आठवते मी २००३ ला औरंगाबादेत आल्यावर एका गावात ४ मराठ्यांवर हल्ला झाला होता. हल्ला करणारे प्रचंड श्रीमंत आणि भक्कम राजकीय आश्रय बाळगणारे होते. त्यामुळे प्रशासनाकडून न्याय मिळण्यास विलंब होणारच. परंतु अण्णाच्या छाव्यांनी त्या मुजोर आणि माजोर धेंडाला तत्काळ वठणीवर आणले. त्या व्यक्तीने छावाची एवढी दहशत घेतली की काही दिवस तो फरार झाला होता. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठ्यांच्या नादाला लागू नका अशी डरकाळी अण्णांनी फोडली होती.

अन्नाची तऱ्हाही वेगळीच. पोर सवदा वय असलेले अण्णा बलदंड अंगरक्षक घेऊन फिरत असत. परभणीला अण्णांनी जी सभा घेतली होती त्या सभेचा विक्रम आजपर्यंत एखाद्या राजकीय पक्षालाही मोडता आला नाही आणि तेव्हा अन्नाचे वय तरी काय अवघे २९-३० वर्ष. अन्नाचे नाव निघाले की भले भले लोक टरकत असत. अन्नाच्या आंदोलनांचीही वेगळीच तऱ्हा होती. मी लातूरला असताना एका विद्यार्थ्याला जिल्हाधीकार्याने सही दिली नाही म्हणून जिल्हाधीकार्याला अण्णांनी चांगलेच बदडून काढले होते. असा होता अण्णासाहेबांचा न्याय. न्यायापुढे अण्णांनी परिणामाची तमा बाळगली नाही. म्हणूनच खेडे गावात अन्नाला मोठा जनाधार मिळाला. माझ्या पाहण्यात असे एकही गाव नाही की जिथे मी छावाची शाखा पहिली नाही. अगदी काल परवा पर्यंत अण्णा अपंग झाले असतानाही समाजासाठी दौरे करत होते, मोर्चे काढत होते, ठीक ठिकाणी सभा घेत होते.

एखाद्या गावात अन्नाची सभा असल्यास प्रचंड गर्दी व्हायची आणि अचानक अण्णासाहेबांचे येणे रद्द होणार असल्यास अण्णा थेट मोबाईल वरून भाषण देत असत. अण्णांच्या अशा सभांची बरीच खिल्ली उडविली जायची परंतु या सभेतून एखादाही कार्यकर्ता उठून गेलेला मी पहिला नाही. ग्रामीण युवक पहिल्याच भेटीत अण्णांच्या प्रेमात पडायचे. पुन्हा आयुष्यभर अन्नाची साथ सोडायची नाही अशा शपथा घ्यायचे. म्हणून छावाची अनेक शकले झाली पण कायम दरारा निर्माण करण्यात अण्णाचा हात कुणी धरला नाही आणि भविष्यात धरू शकणार नाही.

अन्नाचे सगळे वागणे बोलणे आणि राहणे राजबिंडे होते.बामणी मिडिया वाल्यांनी ठाकरे कुटुंबाला कितीही वाघ म्हणून रंगविले तरी महाराष्ट्रात अण्णा साहेबच खरा वाघ होते.काही लोकांनी अन्नासाहेबाचा एवढा दरारा घेतला होता की त्यांनी छावावर बंदी घालण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी मान्य करण्याची हिम्मत सरकारचीही झाली नाही. माणूस फारच उमदा आणि मनाचा चांगला होता. प्रत्येक संघटनेची वेगळी घोषणा असते परंतु अण्णाच्या छाव्यांनी वेगळीच घोषणा तयार केली होती. "अण्णासाहेब जावळे, आम्ही तुमचे मावळे." एवढे राजकीय पक्ष आहेत आणि एवढे नेते आहेत पण अशा घोषणा एकाही नेत्याच्या वाट्याला आल्या नाहीत.

अण्णा येत्या शिवजयंतीला सुद्धा तुमचे मावळे तुमच्या नावाचा जयघोष करतील हो पण त्यांना प्रेरणा देणारा त्यांचा छावा मात्र त्यांना कधीच दिसणार नाही.

डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद.

Comments

Popular posts from this blog

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन