मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल


ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या मातीवर संकटे आली त्या त्या वेळी या मायभुमीने ती संकटे दुर करण्यासाठी योध्दापुत्र जन्माला घातले त्यातीलच एक आमचे प्रेरणास्थान मराठा अस्मितेचा बुलंद आवाज मराठ्यांचे क्रांतिसूर्यअण्णासाहेब जावळे पाटील.
अण्णासाहेब_जावळे_पाटील यांचा जन्म १६ एप्रिल १९७८ ला धाराशिव जिल्यातील मेंढा (घुगीयेथे एका शेतकरीकुटुंबात  झालाहालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण औसा तालुक्यातील तुंगी येथे आश्रमशाळेत झालेत्यांच्या लहानपणीच देवाने त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हि
रावून घेतले.अशा परिस्थितीशी संघर्षकरत त्यांनी मागे वळून  पाहता पदवीपर्यंतचे शिक्षण दयानंद महाविद्यालय (लातूरयेथे घेतलेनंतर ते लातूर येथेच स्थायिक झालेपदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब विद्यार्थीदशे पासूनच आक्रमक होतेअन्याय आणिअत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल्याने समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून ते समाजाच्या विविधसमस्यांविरुद्ध लढू करू लागले.
त्यांनी १९९६ ते २००० पर्यंत प्रादेवीदास वडजे यांच्या छावा संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेत्यानंतर १९फेब्रुवारी २००० ला मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून त्यांनी स्वत:ची अखिल भारतीय छावा संघटना स्थापनकेली. उत्कृष्ट भाषणशैलीनिर्णयक्षमता आणि मागचा-पुढचा विचार  करता लढा देण्याची धमक पाहून मराठवाडाआणि महराष्ट्रभर त्यांचा लौकिक वाढलासमाजाचा प्रश्न तळमळीने मांडत गेल्याने ते फार कमी कालावधीतराज्यभरातील युवकांचे नेते बनलेत्यामुळेच त्यांनी आपली स्वत:ची अशी नवीन ओळख निर्माण केलीआणि काहीदिवसातच ही संघटना येवढ्या नावारूपाला आली की संघटनेच अन अण्णासाहेबांच नाव ऐकलं की सरकारच्या तोंडचपाणी पळायच.
'छावासंघटनेच्या सुरवातीच्या काळात महाराष्ट्राभर सर्वत्र पुढारी अन अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली होतीअशापरिस्थितीत एक तरुण सुंदर युवती काही कामानिमित्त लातूरच्या एका अधिकाऱ्याकडे गेली..एकटी सुंदर अबलातरुणी पाहून त्या अधिकाऱ्याच्या मनात शैतान जागा झाला त्याला वाटलं एकटी अबला तरुणी तिचा आपण फायदाघेतला तर कोण येणार आहे तिच्या मदतीला आणि त्याने तिचा हात धरला  विनयभंग करण्याचा प्रयत्न करूलागला.ती मदतीसाठी ओरडत होती आरडत होती किंचाळत होती पण कोणी तिच्या मदतीला आलं नाहीत्याहैवानाच्या तावडीतून स्वतःची अब्रू वाचवून ती तरुणी रस्त्याने सैरावैरा धावू लागली अन धावत असताना विचारकरत होती कि आपली व्यथा कोणाला सांगायची?? तेवढ्यात तिच्या डोक्यात विचार आला कि अखिल भारतीयछावा संघटना अन्यायाविरुद्ध आक्रमकपणे लढते अन अन्यायाला वाचा फोडण्याच काम करते..जवळच संघटनेच्यासंस्थापक अध्यक्षाचं घर आहे त्यांना भेटावं अन ती त्यांच्या घराकडे वळली.घरी जाऊन त्या तरुणीने झाला प्रकारत्यांना सांगितलाहे सगळं ऐकून तो ऐन तिशीतला पिळदार मिशा,अन चेहऱ्याला साजेशी दाढी,डोळ्यात आग अनचेहऱ्यावर एक प्रकारच तेज असणारा रुबाबदार तरुण खाडकन उठून उभा राहिला अंगात हत्तीच बळ संचारलं.तोतरुण तिला घेऊन त्या अधिकाऱ्याच्या ऑफिस मध्ये घुसला अन त्याला जाब विचारू लागला कि तुम्ही जनतेचीसेवा करायला बसले आहात कि लुबाडण्यासाठी?? स्त्रियांवरची अन गोरगरिबांवरची तुमची मुजोरी सहन केलीजाणार नाही..पण तो अधिकारी ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता मग त्या तरुणाने छावा स्टाईलने त्याअधिकाऱ्याला उघडा करून मारला अन त्या तरुणीला न्याय मिळवून दिला. दाखवून दिल कि सिंहाच्या छाव्यानंबाहेर येऊन एक डरकाळी जरी दिली तरी हे कोल्हे कुत्रे गप्प बसतातसमाजकार्याची आस मनात घेऊन निस्वार्थीभावनेनं काम करणारा तो तरुण म्हणजे मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील.
नंतर खासगी शिकवणी बंद करण्यासाठी त्यांनी केलेली आक्रमक आंदोलने गाजलीजिल्हा परिषदेतील आएएसदर्जाच्या अधिकाऱ्याला संघटनेच्या युवकांनी सामाजिक प्रश्नावर "जाबविचारताना अवलंबलेली "छावा'चीकार्यशैली देशभर गाजलीत्यातून छावाचा जो धाक निर्माण झाला त्यामुळे आंदोलनांची गरजच पडत नव्हतीछावासंघटनेने निवेदन देऊन मागणी केली की प्रशासनाला दरदरून घाम फुटायचा!

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेही त्यांची प्रमुख मागणी होतीत्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसहसर्वांनाच विचार करायला भाग पाडलेआई तुळजाभावानीच्या नावाने तुळजापूर ते औरंगाबाद मराठा आरक्षणजनजागृती यात्रा काढून प्रबोधन केलेडिसेंबर 2012 मध्ये नाशिक ते मुंबई आरक्षण दिंडी काढली. मराठा आरक्षणहक्क परिषद
घेतलीदलित चळवळीतील नेत्यांना आरक्षणाचे महत्त्व पटवून दिलेत्यामुळे दलित नेते रामदास आठवलेभाजपचेनेते विनोद तावडे हे मराठा आरक्षण हक्क परिषेदेला हजर होते.  

त्यांनतर ऍट्रॉसिटी कायद्याला विरोधशेतकऱ्यांना संपूर्ण वीजशुल्क  कर्ज माफ करावेअण्णासाहेब पाटीलआर्थिक विकास महमंडळाला एक हजार कोटींचा निधी मिळावाकर्नाटक सीमाप्रश् सोडवावा आदींसह अन्यविषयांवर त्यांनी आंदोलने केलीवादग्रस्त लेखक "जेम्स लेन‘ प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपाईयांची बीड येथील सभा उधळली होतीकेंद्रीय गृहमंत्रीभाजपचे नेते लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा उमरगाचौरस्ता येथे अडविली होतीमहाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील बाभळी धरणाच्या प्रश्नावरील "छावाच्याआंदोलनाची आंध्र  केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली होतीशिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक करावे,अशी पहिली मागणी छावा संघटनेने केली होतीसलग 13 वर्षे अशी अनेक आंदोलने करून समाजाला जागे करण्याचेकाम त्यांनी केले;
अशी शेकडो सामाजिक प्रश्न हाताळत अण्णासाहेबांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हेविदर्भ आणि पश्चिममहाराष्ट्रात संघटना मजबूत केलीअन २००७ साली परभणी येथे झालेल्या छावा संघटनेच्या अधिवेशनानेमहाराष्ट्रातील गर्दीचा उच्चांक गाठत चार ते साडेचार लाख लोकांची गर्दी जमा केलीत्यामुळे भल्याभल्याराजकारण्यांच्या भुवया उंचावल्यात्यानंतर त्यांना विधानपरिषेदेवर आमदारकीची ऑफर देण्यात आली पण कधीहीलाल दिव्याच्या गाडीत बसणार नाही हे ठरवलेल्या अण्णासाहेबांनी अशा अनेक ऑफर नाकारल्या.
 आक्रमक भाषण शैलीमुळे त्यांनी मराठा तरुणांची मन जिंकली. लाखो तरुण समाजासाठी  साहेबांच्या प्रेमापोटीदिवस रात्र झटत होतेसाहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा कधी केलीच नाही. अण्णासाहेबांनी मराठ्यांना न्यायमिळवुन देण्यासाठी मराठा समाजाला जागे करण्यासाठी गावोगावी जाऊन प्रबोधन केले जाहीर सभा घेतल्या. दिवसरात्र एक करून पायी पायी काट्याकुट्यातुन चालुन विस्कटलेला मराठा समाज एकत्र केला, मराठा अस्मितेसाठीलढता लढता त्यांची प्रकृती बिघडली डॉक्टर ने विश्रांती घेण्यास सांगितलं पण साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केलेअनकाळाने वेळेवर मात केलीअन  फेब्रुवारी २०१३ रोजी मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल यांचीपुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण छावा विश्व दुखाच्या महासागरात बुडाले.
अण्णासाहेब स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता मराठा समाजासाठी व गोर गरीब जनतेसाठी अहोरात्र झटत राहिले  समाजकार्यासाठी स्वतःतच आयुष्य वाहून घेतले, शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांसाठी अन मराठ्यांसाठी लढत राहिले, रसातळातील मराठा समाजात नवचैतन्य भरून क्रांतीची लाट निर्माण केली म्हणूनच त्यांना मराठ्यांचे क्रांतिसूर्य असे संबोधले जाऊ लागले.

सदैव मराठा तरुणांचे प्रेरणास्थान राहिलेल्या क्रांतिसूर्य अण्णासाहेबांना मानाचा मुजरा. अण्णासाहेबांच्या विचारांचा पाईक अण्णासाहेबांचा छावा रामराजे जावळे पाटील.

जय छावा.......
जय अण्णासाहेब......

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन