अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन 

मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल यांनी मराठा अस्मितेसाठी बलिदान दिले दिवस रात्र एक करून पायी पायी चालत काट्याकुट्यातुन चालुन विस्कटलेला मराठा समाज एकत्र केला त्यात त्यांची प्रकृती बिघडली डॉक्टर ने विश्रांती घेण्यास सांगितलं पण साहेबांनी तिकडे दुर्लक्ष केले मराठ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मराठा समाजाला जागे करण्यासाठी गावोगावी जाऊन प्रबोधन केले जाहीर सभा घेतल्या आक्रमक भाषण शैलीमुळे अण्णासाहेबांनी मराठा तरुणांची मन जिंकली लाखो तरुण समाजासाठी व साहेबांच्या प्रेमापोटी जीव द्यायला तयार होती साहेबांनी जीवाची पर्वा कधी केलीच नाही अन्याय दिसता क्षणीच तो दुर करायचे परिणामाची कधी चिंता केली नाही अन्यायाविरुद्ध लढताना अनेक वेळा जेल मध्ये गेले मराठा अस्मितेसाठी लढता लढता काळाने वेळेवर मात केली मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल यांची पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण छावा विश्व दुखाच्या महासागरात बुडाले
दुखाचा डोंगर कोसळला असतानाच वार्या सारख्या बातम्या पसरू लागल्या छावा संपली अण्णासाहेबांची छावा संपली पण लक्षात ठेवा निसर्गाची हवा आणि मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिलांनी निर्माण केलेली अन्यायाविरुद्ध लढणारी आक्रमक संघटना अखिल भारतीय छावा संपण्याची वाट पहाणारे संपतील चंद्र सुर्य तारे हवा आणि अण्णासाहेबांची छावा ही कधीच संपणार नाही
दुखातुन सावरत आता रडायच नाय आता लढायच नानासाहेब जावळे पाटिल यांनी केली गर्जना मग भिमरावभाऊ मराठे विजयकुमार घाडगे पाटिल अप्पासाहेब कुढेकर पाटिल विश्वजीत जाधव आणि इतर शिलेदार अण्णासाहेब जावळे पाटिल यांच्या स्वप्नपुर्ती साठी पुन्हा आक्रमक पणे छावाचा झंझावात निर्माण केला
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात अभिमानाने उभी आहे 

Comments

  1. मला अभिमान आहे की मी या संघटनेचे भाग आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल